जैन धर्मातील तत्त्वे
जैन धर्मातील तत्त्वे
*
o
♨️ जैन धर्मातील तत्त्वे
* जीव -जैन धर्मानुसार जीव हा चैतन्यमय आहे. जीव अविनाशी आहे. जीव हा
देव,मनुष्य, पक्षी,पशु इ. विविध जन्म घेतो.
* अजीव - अजीवाचे धर्म, अधर्म,आकाश,पुदगल, काल, हे पाच प्रकार आहेत.अजीव हे
चैतन्यविरहित आहे.जीव व पाच प्रकारचे मिळून सहा द्रव्ये तयार होतात. जैनांच्या मते
कोणत्याही द्रव्याची तीन अंगे असतात. जैन दर्शनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही दर्शनात
धर्म व अधर्म हे अजीव पदार्थ मानलेले नाहीत.
* पाप-पुण्य- पुण्य म्हणजे,जीवाशी संबंध असलेला व जीवाला स्वर्ग, ऐश्वर्य,इ.चांगले
फळ मिळवून देणारा कर्म समुदाय. पाप म्हणजे पुण्याच्य विपरीत असा कर्मसमुदाय त्याची ८२
कारणे आहेत.त्यांनाच 'आश्रव' असे नाव आहे.
* ज्ञान-जैन तत्वानुसार ज्ञान दोन प्रकारचे असते. परोक्ष व अपरोक्ष. अपरोक्ष
ज्ञान आत्मा कर्मबंधनातून मुक्त झाल्यावर प्राप्त होते.परोक्ष ज्ञान म्हणजे मन किंवा
इंद्रियाद्वारा वस्तूंचे प्राप्त होणारे ज्ञान.
* स्यादवाद - एखाद्या वस्तुसंबंधी किंवा विषयासंबंधी विचार करतांना ७ वेगवेगळ्या
प्रकारे तो विचार मांडता येतो.हा सिद्धांत सप्तभंगी सिद्धांत म्हणून ओळखला जातो.
* (अ) स्यादस्ति = शक्य आहे, की ते आहे,
* (ब)स्यान्नास्ति = शक्य आहे, की ते नाही,
* (क) स्यादस्ति च नास्ति च = शक्य आहे, की ते आहे, आणि ते नाही,
* (ड) स्यादव्यक्तव्यम् = शक्य आहे, की ते अवक्तव्य आहे,
* (इ) स्यादस्ति च अव्यक्तव्यं च = शक्य आहे, की ते आहे, आणि अवक्तव्य आहे,
* (ई) स्यान्नास्ति च अव्यक्तव्यं च = शक्य आहे, की ते नाही, आणि अवक्तव्य आहे,
* (उ) स्यादस्ति च नास्ति चाव्यक्तं च = शक्य आहे, की ते आहे, नाही, आणि अवक्तव्य आहे.
♨️ पंचमहाव्रते
* अहिंसा -
* सत्य -
* अस्तेय -
* ब्रह्मचर्य -
* अपरिग्रह
♨️ तीन गुणव्रते
* दिग्व्रत -
* कालाव्रत -
* अनर्थदंडव्रत
♨️ चार शिक्षाव्रते
* सामायिक
* प्रोषधोपवास
* भोगोपभोग परिणाम
* अतिथी संविभाग
♨️ जैन धर्मातील पंथ
* दिगंबर पंथ -
* श्वेतांबर पंथ
Comments
Post a Comment